“…आता शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी”

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावा आणि ठाण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर निशाणा साधला होता. राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपानंतर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बाबासाहेब पुरंदेर, जेम्स लेन आणि जातीपातीच्या राजकारणावरील आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं.

जेम्स लेनने केलेल्या लिखाणात त्याचा आधार म्हणून बाबासाहेब पुरंदरेंकडून ही माहिती घेतली, असं म्हटलं होतं. एखाद्या लेखकाने गलिच्छ प्रकारचे लिखाण केले आणि त्याला माहिती देण्याचे काम बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं, असं शरद पवार म्हणाले होते.

या गोष्टीचा खुलासा पुरंदरे यांनी कधीही केला नाही. म्हणून त्यांच्यावर काही टीका टिप्पणी केली नसेल. मला याचं दु:ख अजिबात वाटत नाही तर अभिमान वाटतो. त्यामुळे कोणी काही म्हटलं असेल तर मला फार काही बोलायचं नाही, असं शरद पवारांनी म्हटल होतं.

शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी  संदीप देशपांडे यांनी 10 नोव्हेंबर 2003 रोजीचे पत्र समोर आणले आहे. मला वाटतं की, हे पत्र स्वयंस्पष्ट आहे.

जे शरद पवारांनी म्हटलं आहे, बाबासाहेब पुरंदरे यांनी यासंदर्भात कुठेही काहीही म्हटलं नाही. बाबासाहेबांनी या पत्रात त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. या पत्राची कल्पना राष्ट्रवादीला 100 टक्के आहे. तरीदेखील त्यांनी भांडण लावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, आता हे पत्र समोर आलेलं आहे. जर त्यांना वाटत असेल की, चूक झाली तर महाराष्ट्राची त्यांनी माफी मागितली पाहिजे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

यंदाच्या पावसाने बळीराजा सुखावणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

“…आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या”, संजय राऊत RSS वर बरसले

भाजप-मनसे युती होणार?; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं…

“जसा उंच असतो ढोंगा, बरा नाही तो भोंगा”

“स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात”