“आज ना उद्या मी आमदार होणारच, हळद लावून बसलोय पण…”

मुंबई | दोन वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर आनंद शिंदे राजकारणात काही सक्रिय दिसले नाहीत.

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत आनंद शिंदे यांचं नाव होतं, अशी चर्चा होती. मात्र, राज्यपालांनी या यादीवर सही केली नसल्याने राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 आमदारांचा तिढा अद्यापही सुटला नाही.

अशातच आता आनंद शिंदे यांनी याच विषयावर बोट ठेवत आज पुन्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

आमदार होणं हा माझा संविधानिक अधिकार असून राज्यपालपद हे देखील संविधानिक पद आहे, असं आनंद शिंदे म्हणाले आहेत. आज ना उद्या मी आमदार होणारच, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

आता हळद लावून बसलो पण, तो बाबा लग्न लावून द्यायला तयार नाही, असं म्हणत त्यांनी राज्यपाल कोश्यारींना टोला लगावला आहे.

दरम्यान, आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंद शिंदे यांनी चैत्यभूमीवर जाऊन वंदन केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

यंदाच्या पावसाने बळीराजा सुखावणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

“…आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या”, संजय राऊत RSS वर बरसले

भाजप-मनसे युती होणार?; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं…

“जसा उंच असतो ढोंगा, बरा नाही तो भोंगा”

“स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात”