“शरद पवारांनी आधी टुकडे टुकडे गँग आवरावी, टिंगल करणाऱ्यांना…”

मुंबई | मागील काही दिवसांपासून राज्यातील धार्मिक राजकारणाला जोर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली होती.

अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून राज्याचं राजकारण तापलेलं असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

हिंदू समाजातील पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुस्लीम किंवा अन्य कोणत्याही धर्माच्या नेत्यांची टिंगल करण्याची हिंमत होत नाही, हे आश्चर्य म्हणावं लागेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

शरद पवार आस्तिक आहेत की नास्तिक हे मला माहिती नाही पण त्यांचे नेते मात्र आवरजून हिंदू समाजातील पुरोहितांची टिंगल करताना दिसतात. राष्ट्रवादीचा पुरोगामीपणा फक्त सांगण्यापूरता आहे, अशी टीका देखील पाटलांनी यावेळी केली आहे.

समाजाचे तुकडे करण्याचं काम राष्ट्रवादीचे नेेते करत आहेत. शरद पवारांनी राष्ट्रवादीची टुकडे टुकडे गँग आवरावी, असं सल्ला देखील चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना दिला आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मराठा आरक्षणावरून आणि ओबीसी आरक्षणावरून राष्ट्रवादीवर टीका केली आहे. त्यामुळे आता राज्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

CSK vs MI: मुंबईसोबतच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका!

सिंगल लोकांनो नक्की वाचा! विवाहित पुरूषांबाबत कंगणा राणावत म्हणाली…

चिंताजनक! कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय; संशोधनातून ‘ही’ 4 भलतीच लक्षणं समोर

मोठी बातमी! धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेला अखेर इंदौरमधून अटक

“जनता उपाशी आणि मंत्री तूपाशी, हीच का तुमची शिवशाही?”