आम्ही जुळवून घेतलंय, तुम्ही दिवस मोजा- शरद पवार

नाशिक | अमरावती आणि मालेगाव हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात काही संघटना अशा घटना करतात हे योग्य नाही, असं शरद पवार म्हणालेत.

राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या. या प्रवृत्तींना किती महत्त्व द्यायचं, हे लोकांनी ठरवावं. राज्य सरकार चांगलं काम करत असतांना तीन, चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केलं गेलं आहे, असंही शरद पवार म्हणालेत.

बंद आणि हिंसाचाराचा फटका सामान्यांना बसतो. एसटी बंदचा निर्णय नैराश्यातून आहे. सार्वजनिक शांततेला धक्का बसेल, असं काम काही एकेकाळी सत्तेत असलेले लोक हे करतायत हे दुर्दैव आहे, असं म्हणत पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

आम्ही जर ठरवून घेतलं आहे की, जुळवून घ्यायचं. त्यामुळं हे सरकार सुरू आहे. आज सरकार जाईल, उद्या जाईल, असं दिवस मोजायचं काम त्यांना करावं लागेल, असंही पवार म्हणाले.

इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा त्यांच्या विरोधातही नेतृत्व नव्हतं. मात्र, सगळ्या शक्ती मोरारजी देसाई यांच्या मागे उभ्या राहिल्या. त्यामुळं विरोधी पक्षाकडे चेहरा नाही, असं म्हणता येणार नाही, असं शरद पवारांनी सांगितलं.

विक्रम गोखले यांच्या वक्तव्याची नोंद आपल्याला घ्यावी वाटत नाही. असे लोक समाजात, असं म्हणत शरद पवारांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं.

शरद पवार म्हणाले, विरोधकांच्या दृष्टीने भावना झाली की, मंत्र्यांच्या चौकशा वगैरे होणार. अधिकारासाठी याचा वापर केला जातो. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे, असंही शरद पवार म्हणाले.

नक्षलवाद महाराष्ट्रात वाढतोय असं नाही. खरोखरंच नक्षलवादी विचार ज्यांनी स्वीकारला तो वेगळा आहे. असा वर्ग फक्त महाराष्ट्रात आहे असं नाही. आदिवासीवर काही अन्याय झाला असेल तर त्यांना नक्षलवादी ठरवता. मात्र, यात बॅलन्स ठेवायला हवा, असंही पवारांनी सांगितलं.

माझ्या दृष्टने केवळ कायदा सुव्यवस्था प्रश्न नाही, सोशीत लोकांना मुख्य प्रवाहात आणून बदल घडेल. पोलीस बाळाचा वापर करूनच हा प्रश्न सुटेल, असं बोलणं हे असत्य आहे. तिकडे विकास करायला हवा. त्यांना संधी द्यायला हवी, असं शरद पवारांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

बाबासाहेब पुरंदरेंची ‘ती’ इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा- उदयनराजे भोसले 

“शिवशाहीर पुरंदरे यांनी छत्रपतींच्या इतिहासाठी आयुष्य खर्ची घातलं, पण…” 

थंडीतही पाऊस; पुढील चार दिवस ‘या’ भागात कोसळणार पाऊस 

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

  चित्रा वाघ यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता; लवकरच राज्याच्या सभागृहात दिसणार?