‘…म्हणून राज्यात इंधन दर कमी होणार नाही’; अजित पवारांनी सांगितलं कारण

सोलापूर | गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीचं सावट जगभरात सुरु आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. या काळात सर्वसामान्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं.

कोरोना आटोक्यात आल्यावर लाॅकडाऊन उठवण्यात आलं. मात्र लाॅकडाऊन उठवण्यात आल्यावर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचं पाहायला मिळलं होतं.

बऱ्याच वस्तूंच्या किंमती वाढल्या असताना इंधन दरवाढही पहायला मिळाली. देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अजूनही दरांमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे.

अशातच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं इंधन दर कमी केले. केंद्र सरकारच्या पाठोपााठ बऱ्याच राज्यांनीही इंधन दर कमी केला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

इंधन दराविषयी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर येथे राज्य सरकारची भूमिका मांडली. महाराष्ट्राकडे दुसरं उत्पन्नाचं साधन नाही, दैनंदिन खर्च आणि पगार मात्र तसाच आहे, त्यांमुळे इंधरनावरील कपात कमी होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.

पुढे अजित पवार म्हणाले की,  रोज 450 कोटी रुपये हे पगार-पेन्शनला द्यावे लागतात, हा खर्च महिन्यातला दीड लाख कोटी रुपयांच्या पुढचा आहे, हा खर्च करावाच लागतो, त्यामुळे सध्या इंधनावरील कर कपात शक्य नाही.

दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्यांना चांगलाच फटका बसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘पुन्हा गुजरात कनेक्शन’; नवाब मलिकांच्या नव्या ट्विटनं खळबळ

  ‘जोपर्यंत कंगना नाक घासून माफी मागत नाही, तोपर्यंत तिला…’; ‘या’ मंत्र्याचा कंगनावर हल्लाबोल

  थंडीतही पाऊस; पुढील चार दिवस ‘या’ भागात कोसळणार पाऊस,

  “शिवराय खऱ्या अर्थाने बाबासाहेबांमुळेच समजले “

 शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन, वयाच्या 100व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास