‘कोरोना’नंतरचा काळ आर्थिक संकटाचा, काटकसरीने वागा- शरद पवार

मुंबई | कोरोनाशी लढा तर आपण देऊच, पण त्यानंतर येणारा काळ आर्थिकदृष्टीने अत्यंत कठीण राहणार आहे. येणारे दिवस काटकसरीने काढावे लागतील. तेव्हा त्यावर कशी मात करायची याचा आत्तापासून विचार आणि नियोजन करण्याची गरज आहे, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

राज्य सरकार चांगलं काम करत असताना त्यांनी सांगितलेल्या सूचना ऐकल्या पाहिजेत, त्या ऐकल्या नाहीत तर लॉकडाऊनचा कालावधी वाढू शकतो, असंही शरद पवार म्हणाले.

आज अनेक लोक नफेखोरी करताना दिसतात, पण ही कमाईची वेळ नाही. लोकांना मदत करण्याची वेळ आहे. पोलिसांना कठोर कारवाई करण्यास भाग पाडू नका आणि सरकारच्या समंजसपणाला कोणीही दुबळेपणा समजू नये. तशी वेळ आलीच तर सरकार कठोर कारवाई करायलाही मागेपुढे पहाणार नाही, असंही पवार यांनी सुनावलं.

अमेरिका, स्पेन या देशांची सध्या भयावह उदाहरणे आहेत. त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही. आपण मिळालेल्या सूचनांचे पालन करूया, असे आवाहन शरद पवार यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या –

-प्रवरा मेडिकल ट्रस्ट 6 दिवसात उभारणार ‘कोविड 19’चे नवीन हॉस्पिटल; मदतीचं आवाहन

-क्रिकेटप्रेमींना भारत- पाकिस्तान सामन्यांमधला थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार!

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 70 हजार स्थलांतरित कामगारांविषयी घेतला मोठा निर्णय

-जगातील पहिल्या कोरोनाबाधित महिलेचा चीन सरकारवर निशाणा, म्हणाली…

-कोरोनावर मात करण्यासाठी ‘रयत शिक्षण संस्था’ही सरसावली; दिली 2 कोटी रूपयांची मदत