“राजकारणात जेव्हा कुस्ती करायची तेव्हा कुस्ती करायची”

मुंबई | मी क्रीडा क्षेत्रात कधी राजकारण येऊ देत नाही आणि राजकारणात जेव्हा कुस्ती करायची तेव्हा कुस्ती करायची, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना इशाराही दिला आहे.

शिरुर येथे रामलिंग महाराज यात्रोत्सवात आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला पवार उपस्थित होते. व्यासपीठावर बोलताना आयोजकांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला. त्यानंतर बोलण्यासाठी उभे राहिलेल्या शरद पवारांनी अगदी मिश्किलपणे मी अजून म्हातारा झालो नाही, असं म्हटलं.

कुस्तीगीर परिषदेचा माझा जुना संबंध आहे. मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. नवनवीन पैलवान तयार होत आहेत याचा आनंद आहे. राजकारण एका बाजूला आणि क्रीडा श्रेत्र एका बाजूला. मी क्रीडा क्षेत्रात कधी राजकारण येऊ देत नाही, असं पवारांनी म्हटलंय.

शरद पवार रविवारी पक्षाच्या मेळाव्यासाठी उस्मानाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळीही पवारांनी आपण म्हातारे झालो नसल्याचं म्हटलंय.

सतत 52 वर्ष काम करण्याची संधी मला दिली. त्या समाजाचे आणि लोकांच्या भविष्य उज्वल करण्याची जबाबदारी माझी आहे. चार चार वेळा मुख्यमंत्री केलं 82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही मी कधीच थकणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रवादीला जे सोडून गेले ते सोडून गेले त्यांची चिंता करण्याची गरज नाही, असं म्हटलं.

महत्वाच्या बातम्या- 

पंजाबमध्ये फक्त आप, झाडू करणार बाकी सगळे साफ; जाणून घ्या एक्झिट पोलचा अंदाज 

उत्तर प्रदेशात पुन्हा योगी सरकार?, वाचा एक्झिट पोलचा अंदाज 

दोन विमानं समोरा समोर, ममता बॅनर्जी थोडक्यात बचावल्या 

“येणारे येतीलच पण पंतप्रधानपदाची खुर्ची नशिबी येणार नाही हे मात्र नक्की” 

“अमेरिकेच्या विमानावर चीनचा झेंडा लावून रशियावर हल्ला करा”