पार्थच्या बोलण्याला आपण कवडीची किंमत देत नाही; शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारलं

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयमार्फत करावा, अशी मागणी केली होती. पार्थ पवारांनी आपली मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. यावर बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पार्थ पवार यांना यााबाबत विचारल्यावर त्यांनी उत्तर देताना पार्थ पवारांना जाहीररित्या फटकारलं आहे.

माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अप्रगल्भ आहे. मात्र, कुणाला सीबीआय चौकशी करायची असेल तर मी विरोध करणार नाही. मात्र, माझा महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल तर त्यालाही काही विरोध असण्याचं कारण नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांना 50 वर्ष ओळखतो. माझा पूर्ण विश्वास आहे. कुणी काय आरोप केले, याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. माझ्यासाठी हा विषय तितका महत्त्वाचा नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवारांनी पार्थ पवरांना फटकारल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

वाढीव वीज बिलासंदर्भात राज्य सरकार आज घेणार महत्वाची भूमिका

सावधान! ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कॉल करताय?; एकदा ही माहिती वाचा अन्यथा खिशाला लागू शकते कात्री!

’48 तासात संजय राऊत यांनी माफी मागावी’; सुशांतच्या भावाने पाठवलेल्या नोटीसवर संजय राऊत म्हणाले…

…तर आधी केंद्रातलं सरकार पडणार; सुशांत सिंहच्या प्रकरणावर राऊत यांचं मोठं वक्तव्य!