“उद्धव ठाकरे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी तपासात गडबड करू शकतात”

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय नेत्यांमधील वाद चांगलाच पेटला आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी मंत्री आदित्य ठाकरेंना निशाणा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी आदित्य ठाकरेंचं नाव आल्याचा दावा निलेश राणे यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं नाव मर्डर मिस्ट्रीममध्ये आलं आहे. सुप्रीम कोर्टात संशयितांमध्ये त्यांचं नाव रेकॉर्डवर आलं आहे. हे तितकंच गंभीर आहे. नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आदित्य ठाकरेंनी तर दिलाच पाहिजे. मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री तपासात गडबड करु शकतात, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आलं की आदित्य ठाकरे यांचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला असल्याची टीका निलेश राणे सकाळी ट्विट करत केली होती.

दरम्यान, मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून हे सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कधीही होणार नाही. मी यावेळी संयम बाळगला आहे. अशा प्रकारे चिखलफेक करून ठाकरे सरकारला बदनाम करण्याचा षडयंत्र असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पार्थच्या बोलण्याला आपण कवडीची किंमत देत नाही; शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारलं

वाढीव वीज बिलासंदर्भात राज्य सरकार आज घेणार महत्वाची भूमिका

सतत गोड खाताय?; वेळीच व्हा सावधान नाहीतर भोगावे लागतील ‘हे’ वाईट परिणाम!

सावधान! ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कॉल करताय?; एकदा ही माहिती वाचा अन्यथा खिशाला लागू शकते कात्री!

’48 तासात संजय राऊत यांनी माफी मागावी’; सुशांतच्या भावाने पाठवलेल्या नोटीसवर संजय राऊत म्हणाले…