त्यावेळी मलाही बेळगाव पोलिसांनी मारहाण केली- शरद पवार

नाशिक | राज्याचे आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शुक्रवारी सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेले होते. त्यावेळी त्यांना तेथे बेळगाव पेलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यावर मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं आहे.  ते नाशिकमध्ये  झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

बेळगावमधील मराठी लोकांच्या आपण पाठीशी असल्याचं पु्न्हा एकदा शरद पवारांनी म्हटलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि कारखान्यांसाठी चर्चा सुरू आहे. त्यांना दिलासा कसा देता येईल हा आमचा प्रयत्न असल्याचं, पवारांनी सांगितलं आहे.

तीन पक्षांचे सरकार बनवताना आम्ही काही निर्णय घेतले. यात युवकांना रोजगार, औद्योगिक धोरण आणि शेती पुनर्बांधणी अशी धोरण ठरवलीत. या सरकारनं सत्तेचा योग्य वापर करावा, अशी अपेक्षा पवारांनी उद्धव ठाकरे सरकारकडून व्यक्त केली.

दरम्यान, राज्यातील 85 टक्के शेतकरी हा 2 लाख कर्जमर्यादेच्या आत आहेत. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांसाठी वेगळ्या अंदाजपत्रकात केला जाईल, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

देशात दोनच मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणणं गरजेचं- मोहन भागवत

तुकडे तुकडे गँगला माझं कधीच समर्थन नाही…त्यांना माझा विरोधच; कंगणाचा दीपिकाला टोला

साई जन्माचा वाद चिघळला, शिर्डीकरांची बेमुदत बंदची हाक!

राऊतसाहेब, इतिहासावर किती दिवस बोलायचं; आदित्य ठाकरेंकडून राऊतांचा समाचार

अहो, शिवसेना सोबत होती म्हणूनच भाजपचे खासदार निवडून आले- उद्धव ठाकरे