“त्यांनी ती जबाबदारी यशस्वी पार पाडली म्हणूनच मी त्यांना सामाजिक न्यायमंत्रि हे खात दिलं”

मुंबई |  धनंजय मुंडे यांनी गेल्या पाच वर्षात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी यशस्वी पार पाडली. यामुळे त्यांना सामाजिक न्यायमंत्रिपद दिलं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे.

कमकुवत मंत्र्याकडे सामाजिक न्यायमंत्रिपद देण्याची प्रथा आजपर्यंत राज्यात चालत होती. मात्र धनंजय मुंडे यांच्याकडे हे खातं दिल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटलं असेल. पण या खात्यामार्फत सर्वसामान्य आणि गरिब जनतेची कामं तात्काळ होणं शक्य आहे. म्हणूनच हे खातं राष्ट्रवादीनं धनंजय मुंडे यांना दिलं, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

धनंजय मुंडे यांची ग्रामीण जनतेशी नाळ जोडली आहे. त्यांच्या अडचणी धनंजय मुंडेंना माहिती आहेत. ते चांगल्याप्रकारे त्यांच्या समस्या सोडवू शकतात, असं शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, सामाजिक न्याय मंत्रालय पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलं आहे. या खात्याची जबाबदारी मिळाल्याने धनंजय मुंडे आनंदी असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-“आम्हाला जन्मदाखला मागण्यापूर्वी मोदींनी स्वत: च्या आईचा जन्मदाखला दाखवावा”

-“शिवसैनिकांनो निराश होऊ नका बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा”

-“…म्हणून मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढेंची बदली केली असावी”

“कितीही विरोध झाला तरी चालेल पण आता माघार नाही”

-मातोश्रीबाहेर आंदोलन करणारा ‘तो’ शेतकरी फडणवीसांच्या भेटीला