पुणे | महाविकास आघाडी म्हणून कुठे कमी पडलो नाही. एकनाथ शिंदे हे त्यांच्या लोकांना बाहेर न्यायला प्रभावी ठरले. एवढ्या लोकांना बाहेर नेण्याची हिंमत दाखवली यातच त्यांचं यश आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडासंदर्भात बोलताना हे महाविकास आघाडीचं अपयश असल्यासारखं वाटतं नाही असं पवार म्हणाले. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
मी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर बोललो, त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्याचा प्रमुख झाल्यावर तो राज्याचा प्रतिनिधी होतो, राज्याचे सर्व विभागातील लोकांचे प्रश्न सोडवण्याची कामगिरी त्यांच्याकडून व्हावी, असंही पवार म्हणालेत.
फडणवीस यांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारली आहे असं वाटत नाही. त्यांचा चेहरा तसं सांगत नाही. पण ते नागपुरचे आहेत. एकदा आदेश आला की तो पाळायचा असतो, हे कारण असावे दुसरं कारण नसावं, असं फडणवीस म्हणालेत.
माझ्या मते त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये एकदा विश्वास टाकला की पूर्ण जबाबादारी द्यायची. विधीमंडळाची पुर्ण जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी दिली होती. ज्या वेळेला 39 लोकं राज्याच्या बाहेर जातात त्यात दुरुस्त करायला स्कोप राहत नाही, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अजून एका सातारकराची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे- शरद पवार
एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
“देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मोठ्या मनाचा माणूस मिळणं कठीण”
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचं ट्विट, म्हणाले…