‘पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल…’; शरद पवारांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टोला

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर निशाणा साधला आहे. राज्यपालांना अधिक कष्टदायी काम असल्यामुळे त्यांनी वर्षभर अध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला नव्हता. पण हे सरकार आल्यानंतर 48 तासांत तोच निर्णय घेण्यात आला. पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल राज्याला मिळाले, पण हे राज्यपाल, असा टोला पवारांनी कोश्यारींना लगावला आहे.

शिवसेनेच्या मतदारसंघात जाण्याचा आम्ही विचारही केला नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीने एकत्र लढावं अशी माझी इच्छा आहे. पण मी हे अजून माझ्या पक्षात बोललो नाही आणि काँग्रेससोबतही बोललो नाही, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

बंडखोरीच्या निर्णयाला काहीही आधार नाही. लोकांना काहीतरी सांगायचं म्हणून सांगत आहेत, अशी टीकाही पवार यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर केलीय. ते आज औरंगाबादेत बोलत होते.

गेल्या महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सत्ताबदल झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकासाआघाडी सरकार कोसळलं.

राज्यात नवं शिंदे सरकार स्थापन झालं. मात्र जे आमदार शिवसेनेतून फुटून शिंदेंसोबत गेले आमदारांनी थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आरोप केल्याचं पाहायला मिळालं. मात्र पवारांनी हे आरोप फेटाळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी 

‘ती गोष्ट मला चार महिन्यांपूर्वीच समजली होती’; बंडखोर आमदारांबाबत माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट 

कारवाईच्या आदेशानंतर संतोष बांगर यांचं उद्धव ठाकरेंनाच चॅलेंज, म्हणाले… 

सर्वोच्च न्यायालयाचा बंडखोर आमदारांना दिलासा, शिवसेनेत नाराजीचा सूर

लाज वाटत नाही का? उर्फी जावेदची साडी पाहून नेटकरी संतापले, पाहा व्हिडीओ