उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ तब्बल 40 आमदारांनी उद्धव ठाकरे Uddha Thackeray) यांच्याविरोधात बंड केल्यानंतर आता काही खासदारदेखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक पातळीवर काही नगरसेवक आणि कार्यकर्तेदेखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा केलेला आहे.

आगामी काळात शिंदे गटाकडून शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरदेखील दावा केला जाऊ शकतो. असं असताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महत्त्वाची मागली केली आहे.

शिवसेनेने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय धनुष्यबाण या चिन्हाविषयी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती शिवसेनेने केली केली आहे.

आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये, असं शिवसेनेनं आयोगाला म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘ती गोष्ट मला चार महिन्यांपूर्वीच समजली होती’; बंडखोर आमदारांबाबत माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट 

कारवाईच्या आदेशानंतर संतोष बांगर यांचं उद्धव ठाकरेंनाच चॅलेंज, म्हणाले… 

सर्वोच्च न्यायालयाचा बंडखोर आमदारांना दिलासा, शिवसेनेत नाराजीचा सूर

लाज वाटत नाही का? उर्फी जावेदची साडी पाहून नेटकरी संतापले, पाहा व्हिडीओ

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, मुंबई उच्च न्यायालयाचा देशमुखांना आणखी एक दणका