चॅलेंज स्विकारलं तर 2 वर्षात बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण होईल… अशक्य काही नाही- शरद पवार

मुंबई |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज इंदूमिलमध्ये जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आमदार प्रकाश गजभिये हे उपस्थित होते.

बाबासाहेबांच्या स्मारकाचं 25 टक्के काम झालंय. आणखी 75 टक्के काम बाकी आहे. जर चॅलेंज स्विकारलं तर दोन वर्षात बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण होईल. अशक्य काहीही नाहीये, असं पवार म्हणाले. बाबासाहेबांचं स्मारक जगातील लोकांसाठी एक आकर्षण असेल, असंही ते म्हणाले.

मी स्मारकाचं काम करणाऱ्या लोकांना कुठल्याही सूचना केल्या नाहीत. 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल मला या दोन तारखा समोर दिसतात. लाखोंच्या संख्याने लोक इथे येत असतात. सगळा समाज स्मारक बघितल्यानंतर भारावून जाईल, असं पवार म्हणाले.

बाबासाहेबांचं स्मारक महाराष्ट्राचं आणि मुंबईचं मोठं आकर्षण होईल. जगभरातील सर्व बौद्ध लोकं या ठिकाणी येतील. शिवाजी पार्कमध्ये चैत्यभूमी आणि त्याच्या बाजूला आंबेडकरांचं स्मारक हा दुहेरी संगम आहे. या देशातील प्रत्येक नागरिक महामानवाच्या दर्शनासाठी येईल, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-विद्यार्थ्यांना प्रार्थना आणि प्रतिज्ञेनंतर म्हणावी लागणार ‘संविधानाची उद्देशिका’; शासनाचा स्तुत्य निर्णय

-छत्रपती शिवराय आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या तानाजी मालुसरेंचा अपमान; सुप्रिया सुळे संतापल्या

-“शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प का बसलेत??”