आमदार मनीषा कायंदेंचा मोदी भक्तांना खडा सवाल; म्हणाल्या, असं करायला तुमची मजबुरी तरी काय?

मुंबई |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी तर गृहमंत्री अमित शहा यांची तुलना तानाजी मालुसरे यांच्याशी करण्यात आलेल्या एका व्हिडीओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना संताप अनावर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी मोदी भक्तांना खडा सवाल केला आहे.

मोदी भक्तांनो, तुम्हाला महाराजांशी तुलना करणारे असे फोटो किंवा व्हीडिओ करण्याची गरज तरी का पडते? तुमची नेमकी मजबुरी तरी काय आहे? असा सवाल कायंदे यांनी मोदी भक्तांना विचारला आहे. त्यांनी एक व्हीडिओ शेअर करत मोदी भक्तांवर जोरदार टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप नेत्याने ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं. त्या प्रकरणाचा राग शांत होतो ना होतो तोच आता दुसरा तुलना करणारा व्हीडिओ प्रसिद्ध झाला आहे, तुमची नेमकी मजबुरी काय आहे हे आम्हाला कळू द्या, असं कायंदे म्हणाल्यात.

दुसरीकडे ‘पॉलिटिकल किडा’ या कुठल्याश्या ट्वीटर अकाऊंटवरून प्रसिद्ध झालेल्या व्हीडिओचा भाजपशी काहीही संबंध नाही, असं म्हणत भाजपने हात झटकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-चॅलेंज स्विकारलं तर 2 वर्षात बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण होईल… अशक्य काही नाही- शरद पवार

-विद्यार्थ्यांना प्रार्थना आणि प्रतिज्ञेनंतर म्हणावी लागणार ‘संविधानाची उद्देशिका’; शासनाचा स्तुत्य निर्णय

-छत्रपती शिवराय आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या तानाजी मालुसरेंचा अपमान; सुप्रिया सुळे संतापल्या

-“शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प का बसलेत??”