‘काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांची लवकरात लवकर सुटका करा’; पवारांचं सरकारला पत्र

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जॉईंट स्टेटमेंट जारी केलं आहे. त्यामध्ये पवारांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारने स्थानबद्ध केलेल्या नेत्यांची सुटका करण्याची मागणी मोदी सरकारकडे केली आहे. जम्मू आणि काश्मीरचे तीन माजी मुख्यमंत्री आणि राजकीय नेत्यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी पवारांनी या पत्राद्वारे केली आहे.

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांची तात्काळ सुटका करावी, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच काश्मीरमध्ये स्थानबद्ध केलेल्या अन्य राजकीय नेत्यांची सुटका करा, अशी मागणी ही त्यांनी पत्राद्वारे केली आहे. याबाबत त्यांनी सविस्तर ट्विटदेखील केलं आहे.

विविधतेत एकता असलेला भारत आणखीही राज्यघटनेवर उभा आहे. समता, बंधुता आणि अखंडता ही आपल्या संविधानाची मुल्ये आहेत. प्रत्येक नागरिकाला घटनेनं स्वतंत्र आणि मुक्तपणे जगण्याचा अधिकार दिला आहे, असं पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला आणि फारूक अब्दुल्ला यांना सरकारने स्थानबद्ध केलं आहे. कलम 370 रद्द करणे आणि काश्मीरच्या विभाजनाला राज्यसभेची मंजुरी मिळाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“शॅडो कॅबिनेटचा निर्णय अशा शॅडो पक्षाने घेतलाय जो 14 वर्ष कधीही प्रकाशात आला नाही”

-चिकन खाल्याने कोरोना होत नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका – आरोग्यमंत्री राजेश टोपे

-10×10 च्या खोलीत बालपण घालवलेल्या नेहा कक्करने खरेदी केला आलिशान बंगला!

-कोरोनामुळे औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकला; इम्तियाज जलील यांची मागणी

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नो ‘हँडशेक’नंतर आता सभाही रद्द; पवारांचा खबरदारीचा उपाय