…तर त्याला विरोध का करायचा?; अभिनेता शशांक केतकरचा सवाल

मुंबई | आपण भारताचे नागरिक आहोत हे जर सिद्ध करावं लागणार असेल तर प्रॉब्लेम काय आहे?, असा सवाल अभिनेता शशांक केतकर यांनी केला आहे. नवीन कायदा हा भारतात अवैध पद्धतीने राहणाऱ्या लोकांसाठी आहे, कुठल्याही वैध भारतीय नागरिकासाठी नाही, असं शशांक केतकरने म्हटलं आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत. अभिनेता शशांक केतकरनेही सोशल मीडियावर आपलं मत मांडलं आहे.  तसेच या कायद्याला पाठिंबा दिला आहे. शशांकने याबाबत एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

एकीकडे भारताची लोकसंख्या खूप आहे, राहायला जागा नाही, म्हणून आपण रडायचं आणि दुसरीकडे इतकी वर्ष चालत आलेली घुसखोरी थांबवण्यासाठी काही नियम केले तर त्याला विरोध करायचा. हा प्रकार थांबला पाहिजे, असंही शशांक केतकरने म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्लीत घडलेला प्रकार खेदजनकच आहे, कुठलीही हिंसा वाईटच पण चुकीच्या माहितीचा प्रसार करून लोकांना घाबरवणे हे त्याहून वाईट. हे प्रकार ताबडतोब थांबवले पाहिजेत. आपण भारतीयांनीच आपापसात भांडून काहीही हाती लागणार नाहिये.

महत्वाच्या बातम्या-