समजूत काढायला गेलेल्या शशिकांत शिंदेंना उदयनराजेंनी दिली ऑफर!

सातारा | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे त्यांची समजूत काढायला गेलेले राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनाच उदयनराजेंनी ऑफर दिल्यानं चर्चेला आता वेगळ वळण आलंय.

राष्ट्रवादी सोडून जाऊ नका आणि शिवस्वराज्य यात्रेत सहभागी व्हा, अशी अपेक्षा शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंसमोर बोलून दाखवली. त्यानंतर उदयनराजेंनी मात्र तुम्हीसुद्धा विचार करा, असा सल्ला शिंदेंना दिला.

साताऱ्यातल्या शासकीय विश्रामगृहात उदयनराजेंनी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यासोबत बैठक घेवून भाजप प्रवेशाबाबत चर्चा केली. त्यानंतर शिंदेनी त्यांची भेट घेतली. या अर्ध्या तासाच्या चर्चेदरम्यान उदयनराजेंकडून तितकासा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. उलट ते भाजपप्रवेशावर ठाम असल्यांचं दिसत होतं. 

दरम्यान, उदयनराजे आणि खासदार अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र उदयनराजे या यात्रेत सहभागी झाले नाहीत.

महत्वाच्या बातम्या-