शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज… आता आला ‘सीएनजी’वर चालणारा ट्रॅक्टर

शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहचं साधन म्हणजे शेती… शेती म्हटलं की कष्ट, बी-बियाणे, रुपयांची जोड-जोड करुन शेतीला लागणारी साधनं खरेदी करणं आलं. त्यात मग नांगर, टिलर, रोटर अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. काही शेतकरी आपल्या जमिनीची मशागत ट्रॅक्टरने करतात तर काही शेतकरी आपल्याकडे असलेल्या इतर साधनांचा वापर करुन शेतीची मशागत करतात. मात्र आता या साधनांमध्ये एका नव्या साधनाची भर पडणार आहे.

तंत्रज्ञानाचं युग असल्यामुळे शेतकरी देखील बदलत चालला आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात आपल्याला ट्रॅक्टर पाहायला मिळतो. त्यातच आता एका नविन ट्रॅक्टरची भर पडली आहे. ती म्हणजे भारतात प्रथमच डिझेल ट्रॅक्टर आता सीएनजीवर चालवण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी याचा शुभारंभ करणार आहेत.

रावमट टेक्नो सोल्यूशन्स आणि टाॅमासेटो अचिले इंडियाद्वारे संयुक्तपणे तयार करण्यात आलेल्या या ट्रॅक्टरच्या प्रयोगानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यास आणि ग्रामीण भारतात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मदत होईल.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, नरेंद्रसिंग तोमर, पुरुषोत्तम रुपाला आणि जनरल (सेवानिवृत्त) व्ही. सिंगही उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. इंधनाच्या किंमतीवर वर्षाअखेर 1 लाखापेक्षा जास्त रुपयांची बचत केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यांचे उत्पादन देखील वाढण्यास मदत मिळणार आहे.

कसा असणार सीएनजी ट्रॅक्टर –

सीएनजी एक स्वच्छ इंधन आहे, कारण त्यात कार्बन आणि इतर प्रदुषकांचे प्रमाण कमी असते. हा ट्रॅक्टर कमी प्रदुषण करणारा असून, इंजिनचे आयुष्य वाढविण्यास यामुळे मदत होणार आहे. विशेष म्हणजे हा ट्रॅक्टर अत्यंत स्वस्त आहे, कारण सीएनजीचे दर पेट्रोल-डिझेलच्या दरापेक्षा खूप कमी आहेत.

सीएनजी वाहनांचे सरासरी मायलेजदेखील डिजेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा चांगले आहे. तसेच हा ट्रॅक्टर खूप सुरक्षित आहे, कारण सीएनजी वाहनांमध्ये सीलबंद टाक्या असतात, त्यामुळे रिफ्युलिंग किंवा गळती झाली तर स्फोट होण्याची शक्यता कमी असते.

सध्या जगातील सुमारे 1 कोटी 20 लाख वाहने नैसर्गिक वायूवर चालविली जातात. दिवसेंदिवस अधिकाधिक कंपन्या आणि नगरपालिका सीएनजीला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा वेस्ट टू वेल्थ कार्यक्रमाचा एक भाग आहे, कारण बायो-सीएनजी उत्पादनासाठी शेतातील पराली म्हणजेच गवताच्या कच्च्या मालाचा वापर केला जाऊ शकतो.

शेतकऱ्यांना मिळणार 1 लाखाचा लाभ –

इंधनाच्या किमतीवर वर्षाअखेर एक लाख रुपयांहून अधिक बचत करण्याचा शेतकऱ्यांना सर्वात महत्वाचा फायदा या ट्रॅक्टरमुळे होणार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यात देखील मदत होईल. प्रात्यक्षिक अहवालात म्हटले आहे की, रिट्रोफिटेड ट्रॅक्टर डिझेलवर चालणाऱ्या इंजिनपेक्षा जास्त उर्जा उत्पन्न करतो.

डिझेलच्या तुलनेत एकूण कार्बन उत्सर्जन 70% टक्क्यांनी कमी झाले आणि यामुळे इंधनावरील किमतीवर 50% टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे, कारण सध्या डिझेलची किंमत 77.43 रुपये आहे तर सीएनजी फक्त 42 रूपये किलो आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणात ‘हा’ शिवसॆना मंत्री’; चित्रा वाघ यांचा धक्कादायक आ.रोप !

ऐकावं ते नवलच! मला नवऱ्याकडे जायचंय म्हणत चिमुरडी ढसाढसा रडली, पहा व्हिडिओ

‘माझी बहिण वाघिण होती पण…’; पूजा चव्हाणच्या बहिणीची भावूक पोस्ट व्हायरल

धक्कादायक ! ‘या’ कारणामुळे त्याने सांडपाण्याच्या नळीत लपवलं 21 लाखांचे सोनं!

पूजा चव्हाण प्रकरण: मुसक्या आवळायच्या तर वाट कसली बघताय?- चित्रा वाघ