नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ डान्स करतानाचे असतात. तर काही व्हिडीओ गाण गातानाचे असताच.
परंतू व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये काही व्हिडीओ खूपच मजेशीर आणि हस्यास्पद असतात. तर काही व्हिडीओ इतके धक्कादायक आणि भितीदायक असतात की, त्यांना पाहिल्यानंतर आपल्या अंगावरचा काटच उभा राहिल. आपल्याला माहित आहे की अनेकांना प्राणी खूप आवडतात.
बऱ्याच जणांना आपल्या घरात प्राणी पाळायलाही आवडतात. तर काहींना प्राण्यांची खूपच भिती वाटते साध नाव जरी काढलं तरी त्यांचं ततमम होतं.
यापूर्वी तुम्ही प्राण्याचेही व्हिडीओ पाहिले असतील. त्यामध्ये एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करत असतो. नाहीतर काही व्हिडीओंमध्ये कोणताही प्राणी आपला दररोजचा दिवस कसा घालवतो हे दाखवलेलं असतं. आपल्याला माहित आहे मगर ही पाण्यात राहणारा प्राणी आहे.
पाण्यात मगरीचंच राज्य असतं. तिनं एकदा पाण्यात येताना कोणाला पाहिलं की, ती त्या प्राण्याचा लचका तोडल्याशिवाय राहत नाही. याच संदर्भात एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये एका मगरीेने प्राण्यावर किंवा माणसावर हल्ला केला नसून, चक्क एका ड्रोनवर हल्ला केला असल्याचं पाहायला मिळतं आहे. आपल्याला माहित असेल की, ड्रोन हे उपकरण फोटोग्राफी, व्हिडीओग्राफीसाठी वापरले जाते. या उपकरणाच्या मदतीने आपण किती दूर असलेले दृश्य पाहू शकतो.
नदीजवळ एक ड्रोन येते आणि हे पाहून त्या पाण्यातील मगर चवताळून पाण्याबाहेर येते. बाहेर आल्यानंतर तिला ड्रोन दिसतो. ती कोणताच वेळ न घालवता त्या ड्रोनवर हल्ला करते. तेवढ्यात ड्रोन तिच्यापासून दूर जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.
महत्वाच्या बातम्या-
बॉडी बिल्डरसारखी बॉडी बनवणं तरूणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ
भर मंडपात मेहुणीने असं काही केलं की नवरदेवाचा झाला पोपट, पाहा व्हिडीओ
ऐटीत मासे पकडायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ
‘आता तो माझ्या आसपास नाही परंतु…’; ‘त्याच्या’ आठवणीत मलायकाला अश्रू अनावर
ट्विंकलने पोस्ट शेअर केली अन् राखी भावूक झाली, वाचा काय आहे नेमकं प्रकरण