पोटच्या मुलानं नाकारलं अन् सख्ख्या भावानं सोडलं; ‘ती’ स्मशानात एकटीच जळत राहिली!

बारामती | बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या परिसरातील 75 ते 80 वर्षाची वृद्ध महिला हवा पालटासाठी मुंबईत आपल्या मुलाकडे गेली होती. मात्र मंगळवारी अचानक सोमेश्वरनगर परिसरात तिचा मृतदेह आढळून आला.

ही वृद्ध महिला वयाच्या शेवटापर्यंत सोमेश्वरनगरमध्ये एकटीच राहत होती. रक्ताची नाती कधीही तिच्या जवळ आली नाहीत. आयुष्यभर दुसऱ्याच्या शेतात काम करून या महिलेने आपल्या पोटाचा प्रश्न सोडवला. मात्र, दोन दिवसांपासून ही महिला निरा-बारामती रोडवरील अक्षय गार्डनपाशी पडून होती. काही युवकांनी तिची काहीच हालचाल होत नाही हे पाहून पोलिसांना माहिती दिली.

वृद्ध महिला अनेक महिन्यांपासून गावात नसल्याने तिला लवकर कोणीच ओळखलं नाही. परंतु ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तिच्या मुलाला फोन केला असता ‘लॉकडाऊनमुळे मी येऊ शकत नाही तुम्ही अंत्यविधी उरका’ असं उत्तर पोलिसांना मिळालं. सोमेश्वरनगरमध्ये स्थायिक सख्ख्या भावानंही तिचा तिरस्कार केला.

लॉकडाऊन असतानाही ही महिला मुंबईवरून आली कशी? हा प्रश्न सर्वांना पडला असताना, काल एक चारचाकी गाडी या महिलेला इथे सोडून गेल्याचं प्रथमदर्शियांनी सांगितलं. शेवटी सामाजिक कार्यकर्ते व लांबच्या नातेवाईकांच्या मदतीने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सभापती भडकले; ‘या’ कृत्यामुळे दिली समज!

आई-वडिलांची मुलीच्या डोळ्यासमोरच हत्या; मुलीनं ‘ऑन द स्पॉट’ असा घेतला बदला!

पुण्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये घडला धक्कादायक प्रकार; महिलेला सुरक्षारक्षकाने…

मराठा क्रांती पुन्हा उतरणार रस्त्यावर! आता ‘या’ मागणीसाठी उपसलं आंदोलनाचं हत्यार

“दोन भावांच्या राजवटीला आम्ही जुमणार नाही; भाजप सर्वांत विध्वंसक पक्ष”