इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार नाही; गेहलोत यांचे मोदींना पत्र

जयपूर | देशभरात सध्या चांगलंच राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पाठोपाठ आता राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनीही केंद्र सरकारवर आरोप केला आहे. ‘सरकार पाडण्याच्या प्रयत्नात सहभागी असलेल्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही,’ असं म्हणत गेहलोत यांनी मोदींना पत्र लिहिलं आहे.

राजस्थानमधील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह काँग्रेस आमदारांनी बंडाचे निशाण फडकवले होते. यानंतर राजस्थानमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला होता.

गेहलोत यांनी आता याबतीत थेट मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये ते म्हणतात, “केंद्र सरकार कोरोना नियंत्रणाची प्राथमिकता सोडून राज्यातील सरकार पाडण्यासाठी मुख्य भूमिका पार पाडत आहे. असेच आरोप मध्य प्रदेशातूनही करण्यात आले होते. यामुळे तुमच्या पक्षाची देशभर बदनामी झाली आहे. तुम्हाला याबद्दल किती माहीत आहे की तुमची दिशाभूल केली जात आहे हे मला माहित नाही. मात्र अश्या कृत्यात सहभागी असलेल्यांना इतिहास कधीही माफ करणार नाही.”

दरम्यान, सचिन पायलट आणि 18 बंडखोर आमदारांवर 24 जुलैपर्यंत कारवाई करू नये असे आदेश राजस्थान उच्च न्यायालयाने दिले आहेत. यावर, आमदारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे यात न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, असं म्हणत विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सभापती भडकले; ‘या’ कृत्यामुळे दिली समज!

आई-वडिलांची मुलीच्या डोळ्यासमोरच हत्या; मुलीनं ‘ऑन द स्पॉट’ असा घेतला बदला!

पुण्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये घडला धक्कादायक प्रकार; महिलेला सुरक्षारक्षकाने…

मराठा क्रांती पुन्हा उतरणार रस्त्यावर! आता ‘या’ मागणीसाठी उपसलं आंदोलनाचं हत्यार

“दोन भावांच्या राजवटीला आम्ही जुमणार नाही; भाजप सर्वांत विध्वंसक पक्ष”