पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी ती चक्क सिंहाशी भिडली अन्…, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर प्राणी-पक्ष्यांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात.

अनेकदा आपण जंगलातील प्राण्याचे व्हिडीओ पाहतो. तर असाच एक जंगलातील प्राण्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीड्यावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आपल्याला माहित आहे की, जंगलातील राजा हा सिंह आहे. सिंहाला अनेक प्राणी घाबरतात. त्याच्या नादाला तर सोडाच त्याच्या जवळून कोणी जायची हिंमतही करत नाही. परंतू आपल्याला माहित आहे की, मुलावर सगळ्यात जास्त प्रेम ही त्याची आई करत असते. याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी एका आई सिंहाशी भिडली असल्याचं पाहायला मिळतं आहे. व्हिडीओमध्ये सुरूवातीला सिंह पिल्लू झेब्राच्या मुलावर हल्ला करता त्या झेब्राच्या पिल्लाची मान आपल्या जबड्यात धरतो आणि त्याला खाली लोळवतो.

हे पाहून त्या पिल्लाची आई आपल्या पिल्लाला सिंहाच्या तावडीतून सोडवण्यासाठी येते. त्यानंतर ती त्या सिंहाशी भिडते. परंतू तो सिंह त्या झेब्रावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र आई ती आईच असते. इेब्रा पिल्लाची आई हार मानत नाही. ती पूर्ण शक्ती लावून त्या सिंहाचा सामना करताना व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

हा व्हिडीओ पाहून कोणाचेही डोळे पान्हावतील. असं म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हा व्हिडीओ ही म्हण खरी असल्याचा एक उत्तम उहाहरण असल्याचं म्हणायला हरकत नाही.

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘@animalsworld111’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला अनेकांनी कमेंट केलं असून, आतापर्यंत हा व्हिडीओ जवळजवळ लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुणे हदरलं! तडीपार गुंडाने केला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा…

लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकवली अद्दल,…

कार चोरण्यासाठी आलेल्या चोरांना पळवून लावण्यासाठी तरूणाने…

कोरोना लस घ्यायला आलेल्या तरूणीला डॉक्टर म्हणाले ‘दफा…

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव झालं…