पाकच्या नव्या पंतप्रधानांनी पहिल्याच भाषणात तोडले अकलेचे तारे; मोदींचा उल्लेख करत म्हणाले…

इस्लामाबाद | भारताविरूद्ध सतत गरळ ओकणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धाकले बंधू आणि पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाज पक्षाचे नेतृत्व करणारे शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असणार आहेत.

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानात मोठी राजकीय उलथापालथ सुरू होती. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. त्यानंतर त्यांनी पाॅलिटिकल इनिंग संपल्याची चर्चा आहे.

पाकच्या संसदेत आज पंतप्रधानपदासाठी मतदान करण्यात आलं. त्यावेळी शाहबाज यांना 174 मतं मिळाली. त्यानंतर आता शाहबाज शरिफ पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान असणार आहेत.

अशातच आता शाहबाज शरीफ यांनी पहिल्याच भाषणात अकलेचे तारे तो़डल्याचं पहायला मिळालं आहे. संसदेत बोलताना शाहबाज यांनी काश्मीरचा दरवेळीचा राग पुन्हा आवळला आहे.

जम्मू आणि काश्मीरमधून भारताने कलम 370 हटवल्यानंतर इम्रान सरकारने त्याविरुद्ध पाऊल उचलणं आवश्यक होते. मात्र, तसं झाले नाही, असं शाहबाज शरिफ म्हणाले आहेत.

आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत पण काश्मीरचा प्रश्न सुटेपर्यंत ते शक्य नाही. काश्मीरबाबत आमची भूमिका बदलू शकत नाही, असंही शाहबाज शरिफ यांनी देखील नापाक रंग दाखवले आहेत.

दरम्यान, काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे, असा माझा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना संदेत असल्याचं शाहबाज शरिफ यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

लाॅकडाऊनमुळे चिनी लोकांचे हाल बेक्कार, घरातच कैद झाल्याने खाण्या-पिण्याचे हाल; पाहा व्हिडीओ

सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मोठी बातमी! किरीट सोमय्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने पुन्हा पोलीस कोठडी सुनावली

“राजभवनाचे बँक खाते नव्हते म्हणून…”; सोमय्यांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा