“केंद्र सरकारला लाज वाटत असेल तर…”, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत आयएनएस विक्रांत प्रकरणावरून गंभीर आरोप करत आहेत. सेव्ह विक्रांत मोहिमेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठ्या निधीचा अपहार केला, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यातच न्यायालयाने किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

त्यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्राला लाज वाटत असेल आणि आपल्या सैनिकांविषयी आस्था आणि जाणीवा असतील तर किरीट सोमय्यांची सुरक्षा काढून घेतली पाहिजे, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.

केंद्रीय तपास यंत्रणांनी किरीट सोमय्यांचा तपास करून महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे. शंभर टक्के किरीट सोमय्या भाजपशासित राज्यामध्ये लपलेले असतील. गोव्यात किंवा गुजरातमध्ये ते असतील, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

गोवा आणि गुजरात या दोन राज्यांमध्येचं महाराष्ट्रातील गुन्हेगारांना आश्रय मिळतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं, असा सल्ला संजय राऊतांनी दिलाय.

किरीट सोमय्यांना अटक करून पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे. त्यांना माहिती आहे सोमय्या कुठे लपला आहे. सोमय्या कुठे लपलाय मलाही माहिती आहे. मी पोलिसांनाही सांगणार आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्या यांच्या वकिलांनी न्यायालयात राजभवनाचे खाते नव्हते म्हणून किरीट सोमय्यांनी सेव्ह विक्रांतचा निधी पक्षाला दिला, असा खुलासा केला. त्यावरूनही संजय राऊतांनी तोफ डागली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या या महाशयाने सेव्ह विक्रांतच्या नावाने पैसा गोळा करण्यास सुरूवात केली होती. त्याकाळातील त्यांचे ट्विट्स आहेत. त्यांनी फक्त 711 डबे फिरवले नाहीत. त्यांच्याकडे जमा झालेले डबे 711 ते काहीही म्हणतील, अशी टीका संजय राऊतांनी केली.

दरम्यान, किरीट सोमय्यांनी सेव्ह विक्रांतच्या नावावर अनेकांकडून पैसे घेतले. याच्या कोणत्याही पावत्या नसतात. गोळा केलेले पैसे राजभवनात जमा करू, अशी भूमिका सोमय्यांनी घेतली होती. त्यावेळी राजभवनाच्या नावावर कोणतेही अकाउंट नव्हते, याची कल्पना किरीट सोमय्यांना नव्हती का?, असा सवाल संजय राऊतांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मोठी बातमी! किरीट सोमय्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने पुन्हा पोलीस कोठडी सुनावली

“राजभवनाचे बँक खाते नव्हते म्हणून…”; सोमय्यांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

“अजून वेळ गेली नाही, उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत यावं”