शाइनिंग करत दुचाकी चालवायला गेला अन्…, पाहा तरूणाचा मजेशीर व्हिडीओ

नवी दिल्ली | आजकाल प्रत्येकाकडे स्वत:ची गाडी असते. प्रत्येकजण ज्याला हवी तशी ती चालवत असतात. काही लोक तर रोडवरील सिग्नलही पाळत नाहीत.

यापूर्वी आपण सोशल मीडियावर गाडी चालवतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. काहीजण तर खूपच स्पिडमध्ये गाडी चालवतात. याच संदर्भात एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एका तरूणाचा आपली दुचाकी चालवता-चालवता अचानक तोल जातो आणि तो ती गाडी अंगावर घेऊन रस्त्यावर पडतो. एका रस्त्यावरून एक तरूण आपली मोटारसायकल शायनिंग करत खूप वेगामध्ये चालवत आहे. चालवताना तो त्या गाडीवर उभाही राहत आहे.

असं करत-करत तो आपला एक पाय उचलतो आणि जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करतो. हे करत असताना तो एखादा राइडर असल्यासारखी ती गाडी चालवत आहे. मध्येच तो गाडीच्या हॅंडलवरचे हात सोडून देत आहे. तर मध्येच तो गाडीच समोरच चाक हवेत उडवत असल्याचं पाहायला मिळचं

परंतू गाडीच स्पिड खूप असल्यामुळे पुढे जाऊन त्याचा तोल जातो आणि तो भर रस्त्यावर आडवा पडतो. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून यावर खूप मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला जवळजवळ बऱ्याच लोकांनी पाहिलं असून, त्यातील अनेकांनी या व्हिडीओला शेअरही केलं असल्याचं समजतं आहे.

https://www.instagram.com/reel/CT2JvCWlu1z/?utm_source=ig_embed&ig_rid=61e8d463-5bf0-4b73-8f06-6a5383149a77

महत्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! नवरा-नवरीची वरात निघाली चक्क जेसीबीमध्ये, पाहा व्हिडीओ

‘मम्मी मै क्या कुत्ते का बिस्किट खाऊ?’ पाहा तुरूणाचा मजेशीर व्हिडीओ

मालकिनीला वाचवण्यासाठी चक्क कुत्र्याने केला जिवापाड प्रयत्न, पाहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ

अभिनेत्री मानसी नाईकने ‘हा’ फोटो सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

तरूणाचा देसी मायकल डान्स होतोय तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ