शिवसेनेने घेतले दोन मंत्र्यांचे राजीनामे???

मुंबई  | शिवसेनेनं मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या दोन नेत्यांचे राजीनामे घेतल्याची माहिती आहे. रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत या दोघांचेही राजीनामे घेतल्याचं कळतंय.

भाजपकडून ‘ऑफिस ऑफ प्रॉफिटनुसार’ आक्षेप घेण्याची तयारी केली होती. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेने दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन ठेवले आहेत. वायकर आणि सावंत यांच्याकडून मात्र अशा कुठल्याही घटनेचा इन्कार करण्यात आला आहे.

वायकर यांची 11 फेब्रुवारीला मुख्यमंत्री सचिवालयात प्रमुख समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर 14 फेब्रुवारीला अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य शासनाने अध्यादेश काढून ही नियुक्ती केली आहे. अध्यादेशात रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत यांना देण्यात येणारे, भत्ते आणि सुविधा यांचा उल्लेख वादाचं कारण बनलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-देश तर सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे मग मशिदीच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना का नाही- शरद पवार

-रुपाली चाकणकरांनी स्त्रियांना दिला खास संदेश म्हणतात…

-राज ठाकरेंचं शिवाजी महाराजांना अभिवादन; दिला ‘हा’ खास संदेश

-“काँग्रेस सरकारने कसाबला जिवंत पकडून फाशी दिली. देशभक्ती ती हीच!”

-ट्रम्प म्हणतात, मोदी आवडतात पण…