तृप्ती देसाईंनी केला इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल

सांगली | ह.भ.प. इंदोरीकर महाराज देशमुख आणि त्यांच्या समर्थकांवर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आणि तृप्ती देसाईंचे चारित्र्यहनन केल्याप्रकरणी राज्यातील पहिली तक्रार सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे. भुमाता ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष मीनाक्षी शिंदे यांनी आज दिनांक 19 फेब्रुवारी 2020 रोजी ही तक्रार दाखल केली आहे.

सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इंदोरीकरांवर भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणावरुन इंदोरोकरांच्या समर्थकांनी देसाई यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली होती.

तृप्ती देसाई यांना अश्लील शिवीगाळ, ठोकून काढण्याची धमकी तसेच कपडे काढून मारण्याची धमकी इंदोरीकर समर्थकांकडून देण्यात आली आहे. तृप्ती देसाई या प्रतिष्ठित असून त्यांचे चारित्र्यहनन आणि बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे इंदोरीकर आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

तृप्ती देसाई या ख्रिश्चन धर्माच्या नसताना त्या ख्रिश्चन असल्याचं सांगत त्यांची बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचंही तक्रारीत म्हणण्यात आलं आहे. दरम्यान, इंदोरीकर महाराज आणि तृप्ती देसाई यांच्यातील वाद चांगलाच पेटताना दिसत आहे.

86933484 492737111642843 7237796973602930688 n.jpg? nc cat=107& nc oc=AQmeedXh kcbdDJP IPyv8hMlIOoyhkftS9eBnUFa8w2TWr5VTWVs639A2pd0LqNmbw& nc ht=scontent.fbom5 1

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेनेने घेतले दोन मंत्र्यांचे राजीनामे???

-देश तर सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे मग मशिदीच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना का नाही- शरद पवार

-रुपाली चाकणकरांनी स्त्रियांना दिला खास संदेश म्हणतात…

-राज ठाकरेंचं शिवाजी महाराजांना अभिवादन; दिला ‘हा’ खास संदेश

-“काँग्रेस सरकारने कसाबला जिवंत पकडून फाशी दिली. देशभक्ती ती हीच!”