…म्हणून या नेत्याने बाळासाहेबांच्या स्मारकापुढे कान पकडून काढल्या उठाबश्या!

मुंबई |  आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. विविध क्षेत्रातले लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कच्या त्यांच्या स्मृतीस्थळावर दाखल होत आहेत. शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनीही बाळासाहेबांचं स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलंय. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेपुढे कान पकडून उठाबश्या काढल्या. शिवसेना सोडणं ही माझ्या आयुष्यातील खंत होती, असं म्हणत त्यांनी आज बाळासाहेबांची माफी देखील मागितली.

बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक म्हणून शिशीर शिंदे यांची ओळख होती. परंतू शिवसेनेला जय महाराष्ट्र करत त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला. तिथे एक टर्म आमदारकी भूषवल्यानंतर त्यांचं मनसेत मन रमलं नाही. आणि काहीच महिन्यांपूर्वी त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.

शिशीर शिंदे उद्धव ठाकरे आणि मातोश्रीचे निकटवर्तीय मानले जातात तसंच उद्धव ठाकरे यांंचे विश्वासू म्हणून देखील त्यांची ओळख आहे.

दरम्यान, आज सकाळीच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.

महत्त्वाच्या बातम्या-