खळबळजनक! शिवसेना आमदाराच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या

मुंबई | एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या पत्नी रजनी मंगेश कुडाळकर (Rajni Kudalkar) यांनी आज गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली आहे.

जनी यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस कुडाळकर यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना रजनी यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला.

रजनी यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याची चर्चा सुरु आहे. पण त्याबाबतची अधिकृत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

जनी कुडाळकर यांनी आत्महत्या नेमकी का केली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण त्यांच्या आत्महत्येने मतदारसंघातील नागरीकांना धक्का बसला आहे.

रजनी कुडाळकर यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आमदार मंगेश कुडाळकर यांच्याशी संपर्क करून त्यांचे सांत्वन केलं आहे.

रजनी यांच्या मुलाचं काही महिन्यापूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे त्या खचल्याचं बोललं जातं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘कपड्यांचे रंग बदलले म्हणून…’; आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना टोला 

Russia-Ukrain War: “व्लादिमीर पुतिन युक्रेनविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करू शकतात” 

…अन् महिला शिवसैनिकाने शहर प्रमुखास भर रस्त्यात चोपलं; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

“चंद्रकांत पाटील भला माणूस, त्यांना हिमालयात सोडवायला मी पण जाणार”

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या कटात राज ठाकरेंचा सहभाग”