शिवेंद्रराजेंनी पवारांना अव्हेरलं; आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, उद्या भाजपत प्रवेश!

मुंबई : सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवेंद्रराजे पक्षातून राजीनामा घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. 

मंगळवारी विधानसभा सभापती हरिभाऊ बागडेंकडे राजीनामा सुपूर्त करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईतील गरवारे क्लब येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

मुंबईत इतर आमदारांसह त्यांच्याही भाजप प्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याविषयीच्या चर्चेला आता दुजोरा मिळाला आहे.

शिवेंद्रराजेंचा राष्ट्रावादीला रामराम हा पक्षाध्यक्ष शरद पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. साताऱ्याचे आमदार उदयनराजेंशी असलेल्या वादामुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 

रविवारी शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानी नगरविकास आघाडीच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनीच बाबाराजे तुम्ही आता भाजपचे, असा आग्रह धरला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्याशी बोलणं झालं असून पक्षात  त्यांनी चांगली वागणूक दिली जाणार असल्याची भूमिका शिवेंद्रराजेंनी मांडली. 

दरम्यान, राष्ट्रवादी सोडू नये म्हणून शरद पवारांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पक्षाशी प्रामाणिक राहूनही वागणूक नीट मिळत नसल्याचं सांगत शिवेंद्रराजेंनी पक्ष सोडण्याच्या निर्णयावर ते ठाम राहिले. 

महत्वाच्या बातम्या-

-फोडाफोडीच्या राजकारणानंतरही शरद पवार आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर

-‘दिव्यांग प्रवासी डब्या’तून गरोदर महिलाही प्रवास करु शकतात…; अमित ठाकरेंच्या मागणीला यश

-विखेंना शह; सत्यजीत तांबे यांची शिर्डीतून उमेदवारीची मागणी

-पुलवामा हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मॅन वर्सेस वाईल्ड’च्या शूटींगमध्ये व्यस्त???

-“राष्ट्रवादीचे गणेश नाईक आपलं सामाज्र वाचवण्यासाठी भाजपमध्ये येत आहेत”