उदयनराजे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच- शिवेंद्रराजे भोसले

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लागलेली गळती काही केल्या थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील चार खासदारांपैकी एक खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपचा झेंडा हाती घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. तसं झाल्यास हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जाईल.

भाजपने छत्रपतींच्या घराण्यातील वारसदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु केल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे काहीच काळापूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले यांचे धाकटे बंधू शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही उदयनराजेंच्या संभाव्य पक्षप्रवेशाचं स्वागत केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी येत असतात. उदयनराजे भाजपमध्ये आले, तर त्यांचंपण स्वागत आहे. नातं असल्यामुळे कोणत्याही पक्षात असलो तरी दादा मला सपोर्ट करणार, असा विश्वास शिवेंद्रसिंहराजे यांनी बोलून दाखवला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंगळवारी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन उदयनराजेंनी भेट घेतली होती. त्यानंतर काही वेळातच शिवेंद्रसिंहराजेही वर्षा बंगल्यात पोहचले. त्यामुळे उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या राजकीय चर्चा सुरु झाल्या.

उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. उदयनराजेंचा भाजप प्रवेशाचा निर्णय राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असणार आहे. त्याचा संपूर्ण परिणाम राज्याच्या राजकारणावर  होऊ शकतो, असं बोललं जात आहे.

दरम्यान, पूरस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं उद्यनराजेंनी सांगितलं असलं तरी ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-मी वयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला; अभिनेता रणवीर सिंगची कबुली!

-राज ठाकरेंना ईडीची नोटीस; ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या

-भारताविरूद्ध बोलताना सांभाळून बोला; डोनाल्ड ट्रम्प यांचा इम्रान खान यांना सल्ला!

-अटकेच्या भीतीपोटी पी. चिदंबरम घरातून बेपत्ता!

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर???