मी कोणाचीही सुपारी घेतलेली नाही- शिवेंद्रराजे भोसले

मुंबई : साताऱ्याच्या दोन राजांची राजकीय मोर्चेबांधणी सध्या चर्चेचा विषय झाली असून खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे दोघांनीही मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरुन उदयनराजे भाजपच्या वाटेवर जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांची भाजपची वाट अडवण्याचा शिवेंद्रराजेंचा प्रयत्न आहे की काय?, अशीही शंका घेतली जात आहे. त्यावर खद्द शिवेंद्रराजेंनी आपली मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं आहे.

उदयनराजेंचा प्रवेश रोखण्यासाठी शिवेंद्रराजें तयारीला लागल्याचे बोलले जाते. त्यावर शिवेंद्रराजें यांनी आपण कोणचीही सुपारी घेतली नसल्याचे सांगितलं. तसेच लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना मी मदत केली होती. मी आता भाजपमध्ये असलो तरी ते मला मदत करतील, असं सूचक वक्तव्य शिवेंद्रराजेंनी केलं आहे.

मी माझ्या मतदारसंघातील कामानिमित्त मुख्यमंत्र्यांना भेटलो. उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार का? हे मला विचारण्यापेक्षा खासदार साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना विचारा ते व्यवस्थित सांगू शकतील, असं शिवेंद्रराजे म्हणाले आहेत.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रत्येक पक्षातील नेत्यांना अधिकार आहे. त्याप्रमाणे ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेले असतील. उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार याबद्दल कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, असा दावाही शिवेंद्रराजे भोसलेंनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भाजपमध्ये आलेलो आहे. जिकडे प्रवाह आहे तिकडे मी आलेलो आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार नाही असे स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून आदित्य ठाकरेंना पेंग्विन म्हणतात- धनंजय मुंडे

-अभिनंदन यांचा छळ करणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचा खात्मा

-राष्ट्रवादीला मोठं खिंडार; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश???

-“महाराष्ट्र सैनिकांचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही”

-राज ठाकरेंना आवडणार नाही असं काहीही करु नका- अविनाश जाधव