युतीत पुन्हा एकदा वादाची शक्यता; सेना-भाजपमध्ये या कारणामुळे तणाव!

मुंबई |  आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आलीये. अशातच युतीच्या जागावाटपावर आणखीही तोडगा निघत नाहीये. दोन्ही पक्षांनी अनेक जागांवर आपापला दावा सांगितला आहे. दोन्ही पक्षांना आपापल्या महत्वकांक्षा असल्याने माघार कुणीच घेत नाहीये. अशात जागावाटपाच्या मुद्द्यावरून युतीत पुन्हा एकदा तु तु-मैं मैं होण्याची शक्यता आहे. सेना-भाजपमध्ये गेले काही दिवस तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या युतीसमोर पुण्यातील जागांचा पेच निर्माण झाला आहे. पुण्यातील आठ जागांपैकी शिवसेनेला दोन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हडपसर, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीन जागांवर शिवसेनेचं लक्ष आहे. या तीन जागांसाठी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

पुणे शहर शिवसेनेने तश्या प्रकारची आग्रही मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. पुण्यात सध्या आठही जागांवर भाजपचे आमदार आहेत.

दरम्यान, पुण्यातील आठही जागा भाजपने आपल्याकडे ठेवल्यास प्रचारात सेनेचं सहकार्य मिळणार नाही, अशी भीती भाजपला आहे. त्यामुळे युतीचं पुण्यातील जागावाटप नेमकं कसं होणार? की दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-