वनप्लस टीव्ही आणि वनप्लस 7टी सिरीज होणार या दिवशी लाँच

नवी दिल्ली : चायनीज कंपनी वनप्लसचा बहुप्रतिक्षीत ‘वनप्लस टीव्ही’ आणि ‘वनप्लस 7टी’ सिरीजची लाँचिंग डेट जाहीर केली आहे. 26 सप्टेंबरला कंपनी एका सोहळ्यात ‘वनप्लस ७टी’ सीरिज आणि ‘वनप्लस टी.व्ही’ लाँच करणार आहे. तसंच कंपनीनं या डिव्हाइसच्या फिचर्सची माहितीही जाहीर केली आहे. ‘वनप्लस टी’ सिरीजमध्ये कंपनी ‘वनप्लस 7टी’ आणि ‘वनप्लस 7टी प्रो’ लाँच करणार आहे.

वनप्लस 7टी सिरीजमध्ये इन डिस्प्ले फ्रिंगरप्रिंट सेन्सरसोबत 6.55 इंचाचा अमॉल्ड डिस्प्ले देण्याची शक्यता आहे. 128 जीबी आणि 266 जीबी स्टोरेज वेरिएंट असतील.

फोटोसाठी 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासोबत 12 मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स आणि 16 मेगापिक्सल कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तसंच फोनमध्ये 3800 एमएच बॅटरीची क्षमता असेल.

वनप्लस टी.व्हीमध्ये ओएलइडी पॅनल नसणार असं सांगण्यात येत आहे. एका अहवालानुसार, वनप्लस टीव्ही 55 इंच वेरियंटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या टीव्हीचा हाय-एंड वेरियंट 4kHDR डिस्प्लेला सपोर्ट करणार. तसेच इनबिल्ड स्पिकर टीव्हीमध्ये असल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या-