“देवेंद्र फडणवीस नेहमी तोंडावर आपटतात याचं आम्हाला वाईट वाटतं”

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रोज एक भंपक, बिनबुडाचा आरोप करतात व नंतर तोंडावर आपटतात याचे आमच्याइतके कुणाला वाईट वाटत नसेल, असं म्हणत शिवसेनेनं आजच्या सामना अग्रलेखातून फडणवीसांना टोला लगावला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधात देशभरातील तरुण वर्ग पेटून उठला आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोर आंदोलनात एका तरुणीने ‘फ्री काश्मीर’चा फलक घेतलेला फोटो प्रसिद्ध झाला आणि काहींची राष्ट्रभक्ती उसळली, असं सामना मध्ये म्हणण्यात आलं आहे.

फडणवीसांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धारेवरच धरलं. काय तर म्हणे, पाहा, पाहा, उद्धव ठाकरेंच्या नाकासमोर काश्मीरातून फुटून निघण्याचे फलक नाचवले जात आहेत. मात्र, त्यांचा हा आरोप म्हणजे भंपकपणाचा कळस ठरला, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

ज्या मुलीने फ्री काश्मिरचा फलक झळकावला ती मुलगीच एका तासाभरात माध्यमांसमोर आली आणि विरोधी पक्षांच्या ढोंगाचा बुरखाच फाडला. आम्हाला विरोधी पक्षांची काळजी वाटते, त्यांना समुपदेशनाची गरज असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे.

महत्वाच्या बातम्या-