हर्षवर्धन पाटील भाजपत जाऊन फसले???? इंदापूर शिवसेनेच्या वाट्याला…

पुणे |  इंदापुरच्या विधानसभा मतदारसंघाचा तिढा आणखीही सुटला नाहीये. म्हणूनच काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. परंतू इंदापुरची जागा तर शिवसेनेकडे आहे. अशा परिस्थितीत हर्षवर्धन पाटील आगीतून फुफाट्यात पडले की काय?, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

इंदापुरच्या जागेबाबत शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे हे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे.

इंदापुरची जागा परंपरेनुसार शिवसेनेकडे आहे. गेल्या निवडणुकीतसुद्धा ही जागा शिवसेनेने लढवली होती. हर्षवर्धन पाटील, दत्ता भरणे आणि विशाल बेंद्रे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. बेंद्रेंनी क्रमांक तीनची मतं घेतली होती. आताही ही जागा शिवसेनेकडेच राहणार, असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे.

जर इंदापुरची जागा शिवसेना लढवणार नसेल तर आम्हाला खडकवासला जागा द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

एकतर इंदापुरची जागा भाजपला शिवसेनेकडून मागून घ्यावी लागेल नाहीतर हर्षवर्धन पाटील यांना शिवसेनेत प्रवेश करावा लागेल. मात्र उमेदवारीसंदर्भात पाटलांना मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळालं असल्याने ते बिनधास्त आहेत, अशी माहिती कळतीये.

महत्वाच्या बातम्या-