ईडीच्या चौकशीवरुन राज ठाकरेंबद्दल अजित पवारांचं मोठं वक्तव्य

बारामती :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी चौकशी झाल्यापासून तेही बोलायचे कमी झाले आहेत, असं वक्तव्य  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

कोहिनूर मिलप्रकरणी राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी ईडीकडून चौकशी करण्यात आली. सरकारविरोधात भूमिका घेतल्यानेच राज ठाकरेंमागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता.

सरकारने कितीही चौकश्या लावल्या तरीही माझा आवाज बंद होणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. मात्र आता अजित पवार यांनी राज ठाकरे चौकशीनंतर बोलायचे कमी झाले आहेत, असं म्हणून खळबळ उडवून दिली आहे.

अजित पवारांनी यावेळी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत काँग्रेस सोडणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर देखील भाष्य केलं आहे. तीन पिढ्या सरकारमध्ये असताना आणि मंत्रिपद देऊनही काही लोक पक्ष सोडून जात आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो. मग कितीही किंमत मोजावी लागली तरी तो पाळतो. हर्षवर्धन पाटील खोटे आरोप करत आहेत, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-