माझा पक्ष प्रवेश देवाला माहित, त्यांनाच विचारलं तर बरं होईल- छगन भुजबळ

नाशिक : पक्ष प्रवेशाबाबत विचारु नका. आहे तिथे मला काम करु द्या. कदाचित देवालाच माहिती असेल. त्यांनाच विचारुन घेतलं तर बरं होईल, असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पक्षांतराबाबत बोलणं टाळलं आहे. 

गणेशोत्सव सुरु झाला आहे. अंजीरवाडीतील मंडळाच्या गणपतीची छगन भुजबळ आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते पूजा करुन प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावेळी त्यांना पक्षांतराबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी बोलणं टाळलं. 

आम्ही दरवर्षी सहकुटुंब जमतोय. असले प्रश्न विचारु नका. राहता राहिला प्रश्न पक्ष प्रवेशाचा ते मला माहिती नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसमधून छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा अनेक चर्चांनी सोशल मीडियावर शनिवारी दुपारनंतर कमालीचा वेग घेतला. 

दरम्यान, मी या पक्षात चाललो, त्या पक्षात चाललो असं काहीही कृपया करु नका, मी आहे तिथे मला काम करु द्या, अशी प्रतिक्रिया देत पक्षांतराच्या चर्चेला आवर घालण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय. 

महत्वाच्या बातम्या-