येत्या 4-5 दिवसांत भाजपमध्ये ‘मेगाभरती’, पण…. – गिरीश महाजन

मुंबई : भाजपमध्ये पुढच्या 4-5 दिवसांत ‘मेगाभरती’ होणार आहे, असं भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. अनेक जण पक्षात यायला उत्सुक आहेत पण युती असल्याने इनकमिंगला मर्यादा आहेत, असंही ते म्हणाले.

भाजपला 240 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज त्यांनी वर्तवला. काँग्रेस-राष्ट्रवादीची स्थिती या निवडणुकीत गंभीर होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये पुढच्या 10 दिवसांत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल, अशी खात्रीलायक माहितीही समोर आली आहे.

मागची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळी लढवली होती. त्यातल्या काही जागा भाजप आणि शिवसेनेच्या पारंपरिक जागा आहेत. पण काही जागांवरून भाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी सुरू आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग झालं आहे. त्यामुळे पक्षांतर करून आलेल्या नेत्यांचं काय करायचं हाही प्रश्न या पक्षांसमोर आहे.

महत्वाच्या बातम्या-