“भारतात पाकिस्तानी-बांगलादेशी घुसतात… मी बेळगावला का जाऊ शकत नाही, मी जाणारच”

मुंबई | कर्नाटकातील बेळगावमध्ये हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी गेलेल्या राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांच्या दादागिरीला सामोरं जावं लागलं आहे. कर्नाटक पोलिसांनी यड्रावकर यांना ताब्यात घेतलं. त्यांना हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासून पोलिसांनी रोखलं आणि काही वेळात त्यांना सोडून देखील दिलं. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते कर्नाटक पोलिसांच्या मग्रुरीवर चांगलेच आक्रमक झाले आहेत. संजय राऊत आज बेळगावला जाणार आहेत.

भारत देशात पाकिस्तानी, बांग्लादेशी, रोहिंग्या घुसू शकतात. पण महाराष्ट्रातून बेळगावात जाता येत नाही. हे चुकीचं आहे. मी का जाऊ शकत नाही? मी कर्नाटक पोलिसांची दादागिरी सहन करणार नाही. मी जाणारच, अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे.

आज दुपारपर्यंत संजय राऊत बेळगावला पोहचणार आहेत. आज बेळगावात विविध सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमांना राऊत हजेरी लावणार आहेत. राऊतांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.

दरम्यान, संजय राऊत बेळगावच्या हुतात्मा स्मारक परिसराला भेट देणार असल्याची माहिती आहे. आज सकाळपासून  पोलिसांचे त्याठिकाणी स्कॉड फिरताना पाहायला मिळत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्राचा मंत्री कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत म्हणतात, ‘पाहतोच आता!’

-लग्नाची ‘दिशा’ काय म्हणतीय? अवधूतच्या प्रश्नावर आदित्य क्लीनबोल्ड!

-भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि अजित पवार यांंची पुण्यात भेट; चर्चांना उधाण

-रोहित पवारांनी लावला थेट मोदींना फोन; म्हणाले, ‘मेरा नाम तो आपने सुना ही होगा…!’

-बाळासाहेब ठाकरे हाजी मस्तानचे चांगले मित्र होते; डाॅनच्या पुत्राचा दावा