“कलम 370 हटवून काश्मीरप्रश्न संपवला… मग सीमाप्रश्न सोडवायला काय अडचण आहे??”

बेळगाव |  पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरचं कलम 370 हटवून काश्मीरप्रश्न कायमचा हटवला. मग कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न सोडवायला काय अडचण आहे? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर चर्चा करून तातडीने तोडगा काढण्याची मागणी राऊत यांनी केली आहे. राऊत शनिवारपासून बेळगावच्या दौऱ्यावर आहेत.

सीमाप्रश्नी तळमळ असलेले उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. सीमावाद सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे  त्या ठिकाणी संघर्ष सुरूच राहिल. त्यासाठी आम्ही जगातील सर्वोच्च वकिल हरिश साळवे यांची नेमणूक केली आहे. या सगळ्यांना विशिष्ट कालावधी लागेल पण तोपर्यंत मराठी भाषा, संस्कृती जपवणूक करणं आणि ती वाढवणं हे सीमा भागातल्या नागरिकांचं कर्तव्य आहे, असं राऊत म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील बेळगाव सीमाप्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याचं आश्वस्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-काँग्रेस धर्माच्या नावावर देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे- अमित शहा

-…अन् केंद्र सरकार सोन्याची अंडी देणारी कोंबडी विकायला निघालंय- प्रकाश आंबेडकर

-सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठीच मी नवीन पक्षाची स्थापना करणार आहे- सदाभाऊ खोत

-मी माझं जीवन बाळासाहेबांना अर्पण केलं आहे, त्यांचे विचार माझ्या नसानसात आहेत- संजय राऊत

-कसं का होईना झालो ना चार वेळा उपमुख्यमंत्री- अजित पवार