भीषण अपघातात शिवसेनेचा ‘हा’ आमदार गंभीर जखमी

बुलढाणा | महाविकास आघाडीतील शिवसेनेचे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. अपघातात संजय रायमूलकर यांच्यासह त्यांचा चालक आणि सहा अंगरक्षक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी औरंगाबादला नेण्यात आलं आहे.

रायमुलकर यांची गाडी मेहकरकडे येत असताना त्यांच्या इकोस्पोर्ट गाडीची आणि मेटॅडोरची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की यात आमदारांची गाडी पलटी झाली. त्यासोबतच मेटॅडोर ट्रकही पलटी झाला. यामध्ये चालक आणि संजय रायमूलकर गंभीर जखमी झाले.

संजय रायमूलकर, गाडी चालक यांच्यासह त्यांचे अंगरक्षक ज्ञानेश्वर निकस यांचा गंभीर जखमींमध्ये समावेश आहेत. तर बाकी 5 अंगरक्षकांना किरकोळ दुखापत झाली आहे. रायमूलकरांच्या अपघाताची खबर समजताच रायमूलकरांचे समर्थक आणि सर्व शिवसैनिकांनी दवाखान्याच्या परिसरात मोठी गर्दी केली.

दरम्यान, रायमूलकरांवर उपचार चालू आहेत. अद्याप त्यांच्या प्रकृतीची माहिती समजू शकलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-