“एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात”

मुंबई | 1947 साली भारताला स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले, असं वक्तव्य अभिनेत्री कंगणा राणावतने केलं होतं. यानंतर नव्या वादाला सुरूवात झाली आहे. आता शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून कंगणाचा जोरदार समाचार घेतला आहे.

एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात असं एकदा टिळक म्हणाले होते. अभिनेत्री कंगना रानौतला हे वक्तव्य तंतोतंत लागू पडते, अशी खोचक टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचा इतका भयंकर अपमान कधीच कोणी केला नव्हता. कंगनाने भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सगळ्यांवरच अफू-गांजाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवलं आहे, असं म्हणत कंगणाने

या वीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाला सर्वोच्च अशा नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं, हे देशाचे दुर्दैव असल्याची टीका शिवसेनेनं अग्रलेखातून केली आहे.

भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी कंगनाबेनच्या भिक्कार वक्तव्याचा धिक्कार केला. हा देशद्रोहच आहे असे वरुण गांधी सांगतात. अनुपम खेर यांनीही कंगनाचा लाजत लाजत निषेध केला. पण भाजपमधील प्रखर राष्ट्रवादी अद्याप गप्प का आहेत, असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

1947 साली भारताला स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली. पण या भीक मागण्याच्या प्रक्रियेत कंगनाचे सध्याचे राजकीय पूर्वज कोठेच नव्हते, अशी टिप्पणीही अग्रलेखातून करण्यात आली आहे. कंगनाबेनचे हे भिकार वक्तव्य ऐकून गुजरातमधील सरदार पटेलांचा जगातील उंच पुतळाही अश्रू ढाळत असेल, असे अग्रलेखात म्हटले आहे.

रक्त, घाम, अश्रू आणि त्यागातून मिळालेल्या आमच्या स्वातंत्र्याला भीक असं संबोधणं हे राष्ट्रद्रोहाचंच प्रकरण आहे. अशा व्यक्तीस पद्मश्री पुरस्कार देशाचे राष्ट्रपती देतात. त्या सोहळ्यास पंतप्रधान मोदी उपस्थित असतात आणि स्वातंत्र्यास भीकेची उपमा देणाऱ्या कंगणाबेनचे डोळे भरुन कौतुक करतात, असं शिवसेनेनं म्हटलंय.

भाजपला स्वातंत्र्य आणि क्रांतिकारांच्या बलिदानाची थोडी जरी चाड असेल तर राष्ट्रद्रोही वक्तव्याबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले पाहिजेत, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

दरम्यान, कंगनाच्या या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरणही चांगलच पेटलं आहे. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं नाही, तर ते भीक मागून मिळालं आणि जे स्वातंत्र्य मिळाले ते 2014 मध्ये मिळालं, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 

“कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही”

‘लस न घेतलेल्या नागरिकांना…’; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य 

 राज्यातील ‘या’ सहा जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

अनिल देशमुखांना मोठा धक्का! ईडी कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ