“भारत माता 70 वर्षे रडत होती, मात्र 2014 नंतर ती हसायला लागली”

पुणे | अभिनेत्री कंगना रणौतनं देशाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कंगना नेहमीच काहीना काही वादग्रस्त वक्तव्य करत असलेली पहायला मिळत असते. अशातच आता ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.

भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं नाही, तर ते भीक मागून मिळालं आणि जे स्वातंत्र्य मिळाले ते 2014 मध्ये मिळालं, असं वादग्रस्त वक्तव्य कंगना रणौतनं केलं होतं. त्यामुळे देशभरातून तिच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

देशाविषयी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगनाला अनेक टीकांचा सामना करावा लागत आहे. अनेक नेत्यांनी तिला लक्ष करत तिच्यावर हल्लाबोल केला आहे. अशातच कंगनाच्या या वादग्रस्त विधानाविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समर्थन दिल्याचं पहायला मिळत आहे. आता याववरच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात ‘समग्र वंदे मातरम’ ग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी कंगना रणौतवर निशाणा साधला.

‘भारत माता 70 वर्षे रडत होती, मात्र 2014 नंतर ती हसायला लागली. आज भारत माता रडतेय का हसतेय याचा विचार करण्याची गरज आहे, असं वक्तव्य स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केलं.

गोविंददेवगिरी महाराज यांनी काँग्रेसवरही टीका केली. केंद्रातील सत्तेपाशी साम्यवादी लोक होते म्हणून रामसेतू कोणी बांधला नाही, असे बिंबवले जात होते, असे गोविंददेवगिरी यांनी सांगितलं. हे पाप आधीच्या सरकारनं केलं आहे, असं म्हणत स्वामींनी काँग्रेसवर टीका केली.

पुण्यात पार पडलेल्या सोहळ्यात चंद्रकांत पाटलांनीही कंगना रणौतविषयी बोललं. ‘कंगना रणौतचं ते विधान चुकीचंच आहे. त्याचं समर्थन करणार नाही पण मोदी सरकारसंबंधीचं तिचं विधान काही अंशी बरोबरही आहे’, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

कंगनाच्या या विधानामुळे तिच्यावर अनेक टीका होताना दिसत आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहे. त्यामुळे कंगनाला अनेक टीकांचा सामना करावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

  “एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात”

पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 

“कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही”

‘लस न घेतलेल्या नागरिकांना…’; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य 

 राज्यातील ‘या’ सहा जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा