“…म्हणून चंद्रकांत पाटलांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रात थांबावं”

मुंबई | कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामधील पोटनिवडणुकीवरुन शिवसेनेनं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यांचे प्रांताध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या होम ग्राऊंडवर ही पोटनिवडणूक होती. या पोटनिवडणुकीत स्वतः चंद्रकांत पाटील उतरतील व कुस्ती खेळतील असा कयास होता, असं शिवसेनेनं म्हटलंय.

कोल्हापुरात एखादी पोटनिवडणूक झाली तर मी ती लढवीन आणि जिंकून येईन, असं आव्हान पाटलांनी दिलं होतं, पण प्रत्यक्ष पोटनिवडणूक लागताच ते गायब झाले, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘या निवडणुकीत पराभव झाला तर राजकारण सोडून आपण हिमालयात जाऊ अशीही घोषणा केली होती. त्यांना ही संधी कोल्हापूर उत्तरच्या निवडणूक निकालाने दिली होती. ती त्यांनी साधायला हवी होती, पण आता पाटील यांनी त्यावरून पलटी मारली आहे आणि सारवासारव केली आहे. अर्थात चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावं. कारण ते येथे राहतील तोपर्यंत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विजयी होत राहील, असं म्हणत शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका केलीये.

या पोटनिवडणुकांच्या निकालाचं महत्त्व इतकंच की, भाजप आणि त्यांचे भाडोत्री बगलबच्चे देशभरात धार्मिक द्वेषाचा विषाणू पसरवत असताना, निवडणुका लढवण्यासाठी व जिंकण्यासाठी जातीय, धार्मिक हिंसेचे वणवे पेटवत असताना चार राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाला आहे, असं सांगत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला साधलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

रशियाची युक्रेनियन सैन्याला नवी ऑफर, म्हणाले… 

स्वप्न अधूरंच राहिलं, 18 वर्षीय टॉप टेबल टेनिसपटूचा अपघातात मृत्यू 

मृत्यू होत असताना माणूस काय विचार करतो?; संशोधनातून मोठा खुलासा 

गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ; लेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

खळबळजनक! शिवसेना आमदाराच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या