रशियाची युक्रेनियन सैन्याला नवी ऑफर, म्हणाले…

मुंबई | रशियाने मारियुपोलमध्ये (Mariupol) तैनात असलेल्या युक्रेनियन सैन्याला सांगितलं की, जर त्यांनी शस्त्रं खाली ठेवली तर त्यांचे प्राण वाचतील.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी पहाटे ही घोषणा केली. रशियन कर्नल जनरल मिखाईल मिझिंतसेव्ह यांनी सांगितलं की, अजोव्हस्टल इस्पाल कारखान्यात रशियन वेढा असलेल्या युक्रेनियन सैनिकांना (Ukrainian soldiers news) आत्मसमर्पण करण्यासाठी स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे.

रशियन सैन्याने अझोव्ह समुद्रातील प्रमुख बंदर शहराला दीड महिन्यांहून अधिक काळ वेढा घातला आहे आणि आज तैनात केलेल्या युक्रेनियन सैन्याला एक नवीन ऑफर दिली आहे.

मारियुपोल ताब्यात घेणं हे रशियाचं महत्त्वाचं धोरणात्मक लक्ष्य आहे. असं केल्यानं क्रिमियाला लँड कॉरिडॉर मिळेल. रशियाने 2014 मध्ये क्रिमियाचा ताबा घेतला.

मारियुपोलमध्ये युक्रेनच्या सैन्याचा पराभव केल्यानंतर तेथे तैनात असलेल्या रशियन सैन्याला डॉनबासच्या दिशेने जाणं शक्य होईल.

दरम्यान, रशियाच्या लष्करानं युक्रेनच्या राजधानीबाहेरील लष्करी प्लांटवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचं सांगितलं.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल कोनाशेन्कोव्ह यांनी रविवारी सांगितलं की, सैन्याने कीवच्या बाहेर ब्रोव्री येथील दारूगोळा प्लांटवर क्षेपणास्त्रे डागली.

महत्त्वाच्या बातम्या- 

स्वप्न अधूरंच राहिलं, 18 वर्षीय टॉप टेबल टेनिसपटूचा अपघातात मृत्यू 

मृत्यू होत असताना माणूस काय विचार करतो?; संशोधनातून मोठा खुलासा 

गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ; लेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

खळबळजनक! शिवसेना आमदाराच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या 

‘कपड्यांचे रंग बदलले म्हणून…’; आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना टोला