“देशाच्या अर्थव्यवस्थेला लकवा मारलाय”

मुंबई | भारताच्या आर्थिक विकासाला आहोटी लागली असून अर्थव्यवस्थेत आजाराची लक्षणं दिसू लागली आहेत, असं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेनं केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

रघुराम हे अर्थव्यवस्थेचे निष्णात डॉक्टर आहेत आणि त्यांनी केलेली नाडीपरीक्षा योग्य आहे. अर्थात देशाच्या अर्थव्यवस्थेस लकवा मारला हे स्पष्ट दिसत आहे, अशा शब्दात शिवसेनेनं केंद्र सरकारचा समाचार घेतला आहे.

विद्यमान सरकार तज्ञांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही आणि देशाची अर्थव्यवस्था म्हणजे त्यांच्या दृष्टीने शेअर बाजाराचा ‘सट्टा’ झाला आहे. आपली अर्थव्यवस्था ‘आजारी’ आहे. पण मोदी सरकार तेही मान्य करायला तयार नाही, असं म्हणत शिवसेनेनं केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, आपली अर्थव्यवस्था तळमळताना आणि तडफडताना दिसत आहे. आम्ही फक्त चिंता व्यक्त करू शकतो, असं म्हणत शिवसेनेनं केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-