पंतप्रधान मोदींचं ‘हे’ ट्वीट ठरलं ‘गोल्डन ट्वीट ऑफ द इयर’

नवी दिल्ली | आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या ट्वीटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर 2019 हे वर्ष ‘लोकसभा इलेक्शन 2019’ या हॅशटॅगनं गाजवलं, तर सर्वाधिक लोक्रप्रिय 10 व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा अव्वल स्थान पटकावलं.

लोकसभा निवडणूक जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ‘सबका साथ+ सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत’ हे ट्वीट या वर्षाचं गोल्डन ट्वीट ठरलं आहे. या ट्वीटला एक लाख 17 हजार 100 रीट्वीट, तर तब्बल चार लाख 20 हजार लाइक्स मिळाले.

क्रीडा विभागात विराट कोहली याने महेंद्र सिंग धोनीला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे ट्वीट सर्वाधिक रीट्वीट झाले, तर मनोरंजन क्षेत्रात पुन्हा एकदा टॉलिवूडनं आपले अव्वल स्थान कायम ठेवलं. विजय या अभिनेत्यानं ‘बिगिल’ या चित्रपटाबाबत कलेलं ट्वीट सर्वाधिक रीट्वीट झालं.

विराट कोहलीच्या टि्वटला 45 हजार 100 रीटि्वट आणि चार लाख 12 हजार लाइक्स मिळाले. ‘लोकसभा निवडणूक’ आणि ‘चांद्रयान 2’सारखे हॅशटॅग वर्षभरात ट्रेंडिंग राहिले, तर ‘पुलवामा’, ‘आर्टीकल 370’ हे विषयही ट्रेंडिंग राहिलं.

 

महत्वाच्या बातम्या-